बाणेर बालेवाडी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेत जयेश मुरकुटे यांचा सहभाग व पाठिंबा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या युवा संघर्ष यात्रेमध्ये बाणेर परिसरातून जयेश मुरकुटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सहभाग घेतला.

युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यभर युवा संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या युवा संघर्ष यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने युवक सहभागी होत असून या संघर्ष यात्रेला बाणेर बालेवाडी परिसरातून जयेश मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी सहभागी होत पाठिंबा दिला.

यावेळी युवकांच्या विविध प्रश्नांवरती आमदार रोहित पवार यांच्याशी संवाद साधण्यात आला. तसेच बाणेर बालेवाडी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रोहित पवार यांचा सत्कार करून युवा संघर्ष यात्रेला पाठिंबा जाहीर करण्यात आला.

जयेश मुरकुटे म्हणाले, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी युवा संघर्ष यात्रा राज्यभर होत आहे. या यात्रेमध्ये बाणेर बालेवाडी परिसरातील युवकांनी देखील सहभाग घेतला. बाणेर बालेवाडी परिसरामध्ये देखील युवकांशी संवाद साधण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी यावे अशी मागणी यावेळी केली आहे.

See also  बालभारती ते पौडफाटा रस्ता तसेच वनदेवी टेकडी वरील रस्त्याला विरोध -माजी आमदार मेधा कुलकर्णी