एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुनही

मुंबई : एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुनही (https://www.bus.irctc.co.in) आरक्षण करता येणार आहे. तसेच एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांनादेखील सोयीची होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी याकरिता एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझ्म कॉर्पोरेशन (#IRCTC) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामजंस्य करारावर सह्या केल्या.
महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) अर्थात एस.टी. महामंडळ व रेल्वेच्या आयआरसीटीसी यांच्यादरम्यान आरक्षण व्यवस्थापन प्रणाली संदर्भात हा सामंजस्य करार करण्यात आला.

रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येपैकी ७५ टक्के प्रवासी इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) संकेतस्थळावरुन तिकीट आरक्षित करतात. या सर्व प्रवाशांना आता एसटी बसचे तिकीटदेखील आरक्षित करणे शक्य होईल. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ होणार आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करणे शक्य होईल. अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

See also  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अध्यक्षपदाची धुरा पुन्हा शरद पवार यांनी स्वीकारली