सुसगाव परिसरात स्मशान भूमी वरती झळकले शुभेच्छांचे बॅनर

सुसगाव येथील गणपती विसर्जनासाठी पुणे महानगरपालिकेने स्मशान भूमी सुसगाव येथे गणपती विसर्जनाची व्यवस्था केली आहे. या पर्यावरण पूरक विसर्जनासाठी नागरिक स्मशानभूमी जवळ येत असल्याने स्मशान भूमी वरती राजकीय नेत्यांचे शुभेच्छांचे बॅनर झळकलेले पाहायला मिळत आहेत.

सुसगाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होण्याअगोदर या परिसरातील विहिरींमध्ये गणपतीचे विसर्जन या गावातील नागरिक व ग्रामस्थ करत होते. या परिसरातील विहरी मुजवल्या गेल्याने सुसगाव परिसरात विसर्जन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने स्मशानभूमी जवळ हौदाची व्यवस्था केली आहे.

दु:खद प्रसंगासाठी स्मशान भूमी मध्ये नागरिक येत असतात. परंतु पुणे महानगरपालिकेने केलेल्या व्यवस्थेमुळे नागरिकांना आपल्या लाडक्या गणरायाला विसर्जन करण्यासाठी भक्ती भावाने सुसगाव स्मशानभूमी येथे यावे लागत आहे. नागरिकांची होणारी गर्दी यामुळे राजकीय महत्त्वकांक्षा असलेल्या पुढाऱ्यांनी देखील स्मशानभूमीच्या जाळ्यांवर शुभेच्छांचे फलक लावले आहेत.

स्मशान भूमीवर देखील शुभेच्छांचे बॅनर लागल्यामुळे या विरोधाभासाची चर्चा न झाली तर नवलच पण पुणे महानगरपालिकेने देखील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या क्रीडांगणावरती , खाजगी शाळा अथवा मोकळ्या जागांवर विसर्जनाची व्यवस्था करणे आवश्यक होते. पर्यावरण पूरक विसर्जनाची व्यवस्था मोकळ्या जागांवर करण्यात यावी अशी मागणी देखील अनेक सोसायटीच्या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

See also  हॅरिस पुल ते खडकी रेल्वे स्टेशन ४२मी. रुंदीकरणासाठी पालिकेची बांधकामावर कारवाई