यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि जतन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेकरी रोड, धनकवडी येथे मोफत श्रवणयंत्र तपासणी व चष्मे वाटप

धनकवडी : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि जतन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेकरी रोड, धनकवडी पुणे येथे मोफत श्रवणयंत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.एकूण ११०० हुन अधिक लोकांचे नेत्र तपासणी करण्यात आली. ८२० चष्मे वाटप करण्यात आले तसेच  या शिबिरातून १००  लोक मोतीबिंदू ग्रस्त असल्याचे आढळले त्यांना तपासणी करून त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण सेंटर, जतन फाउंडेशन आणि एच. व्ही. देसाई, मेमोरियल हॉस्पिटल, हडपसर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ०३ मार्च व पुढील दिवसात शस्त्रक्रिया करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरील कार्यक्रमासाठी मा. विशाल तांबे , नगरसेवक- म.न.पालिका,पुणे.  मा.बाळासाहेब धनकवडे, माजी नगरसेवक- म.न.पालिका,पुणे.मा. स्मिताताई कोंढरे, माजी नगरसेवक- म.न.पालिका,पुणे. मा. कैलास भोसले,अध्यक्ष- छत्रपती शिवाजी भोसले फाउंडेशन. मा.वैशालिताई  मांगडे – सामाजिक कार्यकर्ता आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

See also  बालेवाडी येथे संजय बालवडकर व नंदिनी गोशाळा यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन