कोथरूड मध्ये पेट्रोल २४ रुपयांनी स्वस्त, वर्धापन दिनानिमित्त कोथरूड युवक राष्ट्रवादी तर्फे यशस्वी मोहीम

कोथरूड: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने युवक राष्ट्रवादीच्या गिरीश गुरूनानी यांनी कोथरूड मधील नागरिकांना अनोखी भेट दिली. देशात महागाई मुळे सामान्य जनता त्रस्त असताना आणि पेट्रोल च्या भावाने उचांक गाठलेला असताना कोथरूडकरांना रविवारी सकाळी एक अनोखी आणि आल्हाददायी भेट युवक राष्ट्रवादी तर्फे देण्यात आली.

गिरीश गुरूनानी यांनी राबवलेल्या या उपक्रमात कोथरूड मधील लोढा पेट्रोल पंपावर येणाऱ्या नागरिकांना पेट्रोल चक्क बाजारभावापेक्षा २४ रुपयांनी स्वस्त देण्यात आले. या उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे उपस्थित होते. अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत पेट्रोल पंपावर सर्व प्रथम येणाऱ्या नागरिकाच्या हातूनच या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी 566 नागरिकांनी यावेळी स्वस्त दरात पेट्रोल भरण्याचा लाभ घेतला.

यावेळी किशोर कांबळे, मिलिंद वालवडकर, अजिंक्य पालकर, निलेश शिंदे, संतोष डोख, शुभम माताळे व समीर उत्तरकर,राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभेचे अमोल गायकवाड, प्रीतम पायगुडे, संदेश कोतकर, ऋषिकेश डफळ, ऋषिकेश शिंदे, केदार कुलकर्णी, प्रथमेश नाईक,श्वेता मिस्त्री,ऋषिकेश कडू आदी उपस्थित होते.

See also  सुस रस्त्यावरील भांडे चौकातील खड्डा बुजवण्यात यावा - मनसे