युवाशक्ती औंध रोड च्या वतीने मोफत शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर

पुणे : युवाशक्ती औंधरोड च्या वतीने – १०वी व १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.

बहुसंख्य विद्यार्थी मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे मोठ्या शैक्षणिक नुकसानीला तोंड देतात. शहरातील वस्ती भागात स्थित विद्यार्थी या सगळ्या पासून वंचित राहतात आणि त्यामुळे चुकीच्या शाखा त्यांच्या कडून निवडल्या जातात. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन युवाशक्ती प्रत्येक वर्षी शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर आयोजित करते आणि त्यावर न थांबता त्यांना पुढे देखील पूर्ण प्रक्रिये मध्ये मदत करते.

यंदाच्या वर्षीही शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर यशस्वीपणे पार पडले. अनेक विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला तज्ज्ञांकडून विविध शैक्षणिक शाखेचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

See also  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची पुणे पुस्तक महोत्सवाला सदिच्छा भेट