औंधरोड-जुनी सांगवी पुलाला त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे नाव द्या – सुनिता वाडेकर

पुणे : पुण्याच्या माजी उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांनी चंद्रमणी संघ औंधरोड ते जुनी सांगवी या ठिकाणी होणाऱ्या नवीन पुलाला त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पुणे महानगर पालिका व पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला निवेदन देऊन केली.

पुण्याच्या माजी उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांनी  पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन मागणी केली आहे. औंध बोपोडी दापोडी परिसरातील नागरिकांनी देखील मागणी केली आहे असे निवेदनात म्हटले आहे.

See also  पवना कॅंपिंग व्यवसाय अधिकृतकरण्यासाठी प्रयत्न सुरु, बाळाभेगडें यांनी घेतली पवना टेंटव्यावसायिकांची भेट