भारतीय डाक विभागाच्या योजना ग्रामपंचायत स्तरावर राबवा :: जिल्हाप्रमुख चांदेरे यांच्या आव्हान

सुस : भारतीय डाक विभागाच्या अनेक नवनवीन योजना आल्या आहेत त्या भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर राबवा म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचेल असे आव्हान पुणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.

या कॅम्पमध्ये पी. एम. किसान लाभार्थी यांचे नवीन खाते, पाच वर्षांच्या आतील लहान मुलांचे आधार कार्ड मोफत काढून आधारकार्डला मोबाइल नंबर लिंक करण्यात आला. तसेच पोस्ट ऑफिसचा 10 लाख रुपयांचा अपघाती विमा काढून देण्यात आला व पोस्ट ऑफिसच्या विविध आकर्षक योजनांची खाती काढून त्यामध्ये सुकन्या समृद्धी योजना पब्लिक प्रोव्हिडंट फंड, रिकरिंग खाते, सेव्हिंग खाते, महिला सन्मान निधी, पोस्टाचा विमा या सर्व योजनांची महिती देण्यात आली.

पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना’ योजना देखील पोस्टात
या योजनेत १ कोटी घरांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. या योजनेसाठी भारतीय डाक विभागास नोडल एजन्सी म्हणून मान्यता दिली आहे. डाक विभाग पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील. लोकांना लाभाची माहिती देतानाच मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये नोंदणीही करतील शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांची माहिती.

See also  सिद्धार्थ शिरोळे यांनी केली मतदारसंघातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीच्या कामांची पाहणी