सुसगाव मधील बाळासाहेब चांदेरे यांची शासन नियुक्त समिती सदस्य (नगरसेवक )पदी निवड

पुणे प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट  करण्यात आलेल्या 34 गावांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी  समिती गठीत करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट ३४ गावांच्या मूलभूत सोयी सुविधासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून यात १८ लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.

नवीन समाविष्ट करण्यात आलेली ही गावे महापालिकेत आली होती. मात्र तेथे महापालिका निवडणुका न झाल्याने या गावांना लोकप्रतिनिधित्व नव्हते. आता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे या सदस्यांच्या मार्फत कामे सुचवण्यात येतील.

राज्य सरकारच्या माध्यमातून १२०० कोटी रुपये व पुणे महानगर पालिकेच्या माध्यमातून १५० कोटीची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.

अमर घुले, उल्हास तुपे, विकी माने, बाळासाहेब चांदेरे, सुनील खांदवे, सचिन दांगट, अश्विनी पोकळे, सविता टाकळे, पियुषा दगडे, राकेश झांबरे, श्रीकांत लिपाने, मच्छिंद्र दगडे, संदीप सातव, बाळासाहेब घुले, भूषण तुपे, वंदना कोंद्रे, राजेंद्र भिंताडे, स्नेहल दगडे यांचे समिती सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.

See also  महाराष्ट्रात मते मागण्याचा मोदींना अधिकार नाही : नाना पटोलेकॉंग्रेस प्रदेश अध्यक्षांची पंतप्रधानांवर टीका