पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पाण्याचा साठा घटत असल्याने मे आणि जून महिन्यात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागेल, अशी शक्यता आहे.

खडकवासला धरण साखळीत खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर अशा चार धरणांचा समावेश होतो. सध्या पाणीसाठा १३.०१टीएमसी इतका आहे. शहरासाठी दोन महिने पुरेल एवढाच हा पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाऊस कमी पडल्याने पाणीकपात अटळ मानली जाते. मात्र, लोकसभा निवडणूक प्रचार चालू असल्याने सत्ताधाऱ्यांनी तूर्त पाणीकपात टाळली आहे. पुण्यात मतदान होताच पाणीकपात लागू केली जाईल, असे अधिकारी सूत्रांकडून सांगितले जाते.

See also  पुण्याची विद्येचे माहेरघर असलेली ओळख प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारे आमदार चंद्रकांत दादा पाटील