शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे उपशहर संघटिका ज्योती नितीन चांदेरे यांच्या प्रयत्नांना यश

सुस : सुस गावातील वाढती लोकसंख्या व होणारी वाहतूक कोंडी यामुळे सुसगावात मुख्य रस्त्यावर नेहमीच अपघात होत असतात वाढलेले अपघात टाळण्यासाठी जागो जागी गतिरोधक आणि रम्ब्लेर लावण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर संघटिका ज्योती नितीन चांदेरे यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाला दिली होती.त्याचा पाठपुरावा करून प्रशासनाने दखल घेत ते काम सुरु करण्यात आले आहे.जागो जागी रम्ब्लेर लावण्यात आले आहेत. लवकरच गतिरोधक सुद्धा बसवण्यात येतील असे आश्वासन महानगरपालिकेच्या वतीने त्यांना देण्यात आले आहे.

सुसगाव परिसरातील वेगाने होणारी वाहतूक व अपघात टाळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. तसेच या परिसरातील पादचारी नागरिक व सोसायटीतील नागरिकांना देखील आपली वाहने सुरक्षित रित्या बाहेर काढण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

 

See also  पाषाणकर दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन