पुण्याची विद्येचे माहेरघर असलेली ओळख प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारे आमदार चंद्रकांत दादा पाटील

पुणे : पुण्याची विद्येचे माहेरघर असलेली ओळख प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी
कोथरूड मध्ये “वाचनालय ऑन व्हील” म्हणजेच “फिरते पुस्तक घर” ही योजना कोथरूड मध्ये राबवली.

कोथरूडच्या विकसनशील भागाला संस्कृती व सांस्कृतिक जीवनाचा वारसा लाभला आहे. अनेक विचारवंत व लेखक तसेच तज्ञ वाचकांची परंपरा या भागात राहिली आहे. कोथरूडची ही ओळख जपण्यासाठी व वाचकांना त्यांचे आवड घरबसल्या जोपासण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवला गेला.

बालेवाडी फाटा, मुरकुटे गार्डन, भारतीय विद्यापीठ शाळा बालेवाडी, साई चौक पाषाण, कर्वेनगर, कोथरूड मधील महत्त्वाच्या चौकांमध्ये हे पुस्तक घर वाचकांपर्यंत पोहोचते. वाचकांच्या आवडीचे पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचत असल्याने याला प्रतिसादही उत्तम मिळाला आहे. वाचनाच्या आणि विचारांच्या माध्यमातून माणसे जोडण्याचा उपक्रम आमदार चंद्रकांत पाटील यांनी राबवला याला हजारो वाचकांचा देखील प्रतिसाद मिळत आहे.

कोथरूड बाणेर बालेवाडी परिसरातील नागरिक प्रश्नांच्या बरोबर सांस्कृतिक विकासाचा वारसा निर्माण करण्याचे काम हे फिरते पुस्तक घर करीत आहे.

See also  पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन