दागिने खरेदी साठी नवीन नियम

पुणे : नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं. आजपासून सोने खरेदी करणाऱ्यांना नवीन नियमांचं पालन करावे लागणार आहे. केंद्र सरकारने आजपासून सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर सहा अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असणार आहे. नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार सहा अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशनशिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही, अशी माहिती भारतीय मानक ब्युरोने याची मार्चमध्येच दिली हाेती.  


चार मार्चला ग्राहक व्यवहार मंत्रालयाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. दागिन्यांवर सहा क्रमांकाचे हॉलमार्क वैध असणार आहे. पूर्वी चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्कबाबत खूप कन्फ्यूजन व्हायचे. आता एकच सहा अंकी नंबर असल्याने कन्फ्यूजन दूर हाेणार आहे. हे नसेल तर कोणताही दुकानदार दागिने विकू शकणार नाही. सरकार गेल्या दीड वर्षांपासून देशात बनावट दागिन्यांची विक्री रोखण्यासाठी नवीन हॉलमार्किंग नियम लागू करण्याच्या प्रयत्नात हाेते. हाॅलमार्कबाबत नियम बदल केला आहे. 
या सहा अंकी हाॅलमार्कबाबत दागिन्यांची शुद्धता ओळखण्याबराेबरच अल्फान्यूमेरिक कोड असेल. याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक म्हटले जाईल. या नंबरद्वारे तुम्हाला या दागिन्यांची सर्व माहिती मिळेल. हा क्रमांक स्कॅन केल्याने ग्राहकांना बनावट सोने किंवा भेसळयुक्त दागिने टाळण्यास मदत हाेणार आहे. 

आजपासून सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. जर ग्राहक जुने दागिने विकायला गेले तर त्यांना त्यासाठी हॉलमार्किंगची गरज भासणार नाही. लोकांकडून जुन्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमामध्ये सरकारने कोणताही बदल केलेला नाही. जुने दागिने सहा अंकी हॉलमार्कशिवाय विकले जाऊ शकतात.

See also  तलाठी भरती घोटाळ्याविरोधात आप चे आक्रोश आंदोलन