खडकवासला मतदारसंघात सुमारे ५६.५३% मतदान; लोकशाहीसाठी उत्स्फूर्त सहभाग

पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानास उत्साहपूर्ण सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदार केंद्रांवर नागरिकांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या, ज्यामुळे लोकशाही प्रक्रियेत जनतेचा सहभाग ठळकपणे जाणवला.
दुपारी १ वाजेपर्यंत २९.०५% मतदान झाले होते, तर दुपारी ३ वाजता ते वाढून ४०.४% झाले. सायंकाळी ५ वाजता नोंदलेली मतदानाची टक्केवारी ५१.५६% होती.तर 6 वाजेपर्यंतची आकडेवारी सुमारे ५६.५३% आहे.


मतदान प्रक्रियेच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने आणि तहसीलदार किरण सुरवसे यांनी सुसज्ज योजना आखल्या होत्या. माहिती तंत्रज्ञान अधिकारी म्हणून अभिषेक धुमाळ यांनी जबाबदारी सांभाळली , तर ‘वोटर टर्नआऊट’ नोडल अधिकारी म्हणून कुणाल मंडवाले यांनी प्रमुख भूमिका बजावली. सहाय्यक अधिकारी वैभव मोटे, तसेच ज्योती उपाशी,रविकांत बडेकर आणि साहीर सय्यद यांनी मतदानाची माहिती पुरवण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.


मतदान केंद्रांवर सुसज्ज सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आणि योग्य नियोजनामुळे मतदान प्रक्रियेला अधिक गती व पारदर्शकता मिळाली आहे.महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि पहिल्यांदाच मतदान करणारे मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी उपस्थित होते. नागरिकांनी लोकशाहीच्या मजबुतीसाठी आपली भूमिका बजावत मतदानाच्या हक्काचा उपयोग केला.
डॉ. माने आणि तहसीलदार सुरवसे यांनी नागरिकांना मतदान प्रक्रियेत अधिकाधिक सहभाग घेण्याचे आवाहन केले होते.

See also  LIC च्या शेअर्स मध्ये ४० % ची घसरण.