भाजपाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

पाषाण  : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिन साई चौक पाषाण सुसरोड येथे साजरा करण्यात आला.विविध कार्य क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या आणि आनंदाने परिसरातील ॲक्टिव सामाजिक कार्य करणाऱ्या ३० ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रम अध्यक्ष म्हणून सबमरीन नेव्ही कमांडर (निवृत्त) श्री गिरीश कोनकर उपस्थित होते. त्यांनी ” ज्येष्ठ नागरिक जिंदगी खुशी से जिओ और समाज देश के लिये योगदान दो” असे सुरेख उत्साही भाषण झाले.
या कार्यक्रमास उत्तर मंडल अध्यक्ष सचिन  पाषाणकर, पालक आणि महायुती समन्वयक प्रकाशतात्या बालवडकर, ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा महामंत्री प्रल्हाद सायकर उपस्थित होते.स्थापना दिना निमित्त भाजप उत्तर कोथरूड  मंडल उपाध्यक्ष कल्याणी टोकेकर यांनी ज्येष्ठ नागरिक सन्मान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  भाजप उत्तर कोथरूड महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली ताई कमाजदार, भाजप पदाधिकारी प्रणिता ताई सांगळे ब्रिजेश राय आणि शोभा ताई शेट्टी यांनी विशेष प्रयत्न केले.

See also  दिल्ली पंजाब प्रमाणेच शिक्षण,आरोग्य, वीज,पाणी या नागरिकांच्या हक्काच्या सुविधा आप मांजरीतील नागरिकांना देईल