शिवसेना भवन येथे पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली नेत्यांची भेट

पुणे : शिवसेना भवन ,मुंबई येथे शिवसेना नेते व सचिव मा. विनायक राऊत  तसेच शिवसेना उपनेते व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक  रविंद्र  मिर्लेकर यांची  सदिच्छा भेट घेतली. यावेळी शहरप्रमुख गजाजन थरकुडे यांच्या समवेत माजी आमदार चंद्रकांत मोकाटे  व पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी  उपस्थित होते.

आगामी विधानसभांच्या पार्श्वभूमीवर कोथरूड मतदार संघामध्ये शिवसेनेची जोरदार बांधणी सुरू आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा लावण्यासाठी कोथरूड मध्ये जोरदार पक्ष बांधणीचा प्रयत्न शहर प्रमुख गजानन थरकुडे यांच्या माध्यमातून होत आहे. कोथरूड मतदार संघातील अनेक जण सध्या सातत्याने शिवसेना भवन येथे नेत्यांच्या संपर्कात असून मातोश्री वर देखील सतत प्रवेश सुरू आहेत.

पुणे शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून कोथरूड मतदार संघामध्ये तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्यासह अन्य पक्षातून शिवसेने मधून निवडणूक लढवणार्यांची देखील मोर्चे बांधणी सध्या पाहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई शिवसेना भवनकडे अनेकांच्या वाऱ्या वाढल्या असून शिवसेना पक्षाचा कोथरूडचा गड राखण्यासाठी जबाबदारी कोणाला मिळणार याबाबत मात्र राजकीय वर्तुळात उत्सुकता पाहायला मिळत आहे.

See also  खडकवासला काँग्रेस अध्यक्षपदावरुन राहुल मते यांची हकालपट्टी