लांडेवाडी येथे ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाजकल्याण विभाग व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे आर्टस्, कामर्स व सायन्स कॉलेज, लांडेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेस सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे  यांनी ११ ते १४ एप्रिल या कालावधीमध्ये  महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांची जयंती साजरी करण्यामागचा उद्देश, अंधश्रद्धा निर्मूलन, विद्यार्थी व भावी नागरिक म्हणून आपल्याकडून अपेक्षित असलेली वर्तणूक या विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी अन्य मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले.

See also  योगीराज पतसंस्थेच्या वतीने गणपतराव बालवडकर यांचा सन्मान तसेच कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस वितरण