संसदेमध्ये मराठा समाजाच्या मागण्या मांडाव्यात म्हणून केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांना मराठा समाजाच्या वतीने निवेदन

औंध : सकल मराठा समाजाच्या मागण्या संसदेमध्ये मांडण्याबाबत मराठा समाजाच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर  मोहोळ यांना मराठा समाजाच्या वतीने औंध येथे निवेदन देण्यात आले.

खासदार जनसंपर्क अभियानाअंतर्गत नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी औंध येथील इंदिरा गांधी पुणे मनपा शाळेमध्ये खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खासदार मधली तर मोहोळ यांची भेट घेत निवेदन दिले.

सकल मराठा समाजाच्या मागण्या संसदेमध्ये मांडाव्यात तसेच मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा याबाबत पाठपुरावा करावा तसेच ओबीसी अंतर्गत जातींचे फेर सर्वेक्षण करावे. कुणबी पुरावे सापडलेल्या मराठा नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत आहे याबाबत कार्यवाही करावी. तसेच अल्पभूधारक व भूमिहीन झालेल्या मराठा समाजातील नागरिकांचा सर्वे शासनामार्फत करावा. मराठा हॉस्टेलची संख्या वाढवावी आदी मागण्या असलेले निवेदन यावेळी देण्यात आले. तसेच मराठा क्रांती मोर्चा व संघर्ष युद्धे म्हणून जरांगे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्या संसदेमध्ये मांडाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी औंध पाषाण बाणेर बालेवाडी सोमेश्वर वाडी सुतारवाडी बावधन सुस महाळुंगे परिसरातील मराठा समाजाच्या नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

See also  मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी आंबेडकर जयंती उत्साहात साजरी