५ कोटी अनुदान पी एम उषा अंतर्गत मिळालेले पुणे जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय माॅडर्न महाविद्यालय, गणेशखिंड

पुणे : गणेशखिंड येथील पी ई सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालयाला राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) अंतर्गत येणाऱ्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पी.एम-उषा) तर्फे ५ कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. असे अनुदान मिळालेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तिसरे तर पुणे जिल्हा व शहर स्तरावरील एकमेव महाविद्यालय आहे.


राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) ही केंद्र प्रायोजित योजना (CSS) आहे, जी 2013 मध्ये सुरू करण्यात आली आहे आणि समानता,  प्रवेश आणि उत्कृष्टतेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्य सरकारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना निधी देण्यासाठी रुसा काम करते.
या अनुदानासाठी भारतभरातून अंदाजे २३०० प्रकल्प सादर झाले. महाराष्ट्रातून ६२० प्रकल्प सादर झाले पैकी ४३ प्रकल्प मंजूर झाले. याचे राज्यस्तरीय सादरीकरण प्रथम एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई येथे व नंतर राज्य प्रकल्प संचनालय मुंबई येथे झाले.
या प्रकल्पाच्या नियमानुसार हे अनुदान महाविद्यालय ठराविक बाबींसाठी वापरु शकते. या विषयी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात म्हणाले, “केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त अर्थसहाय्यातून (६०:४०) पी.एम-उषा ही योजना महाविद्यालयास मिळाली याचा संस्थाचालक, प्राध्यापक व विद्यार्थी यांना विशेष आनंद आहे. हे सर्व संस्थेचे कार्याध्यक्ष मा डॉ. गजानन एकबोटे यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे. या अनुदानामुळे महाविद्यालयात नविन भौतिक सुविधा निर्माण करता येतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षणाशी निगडीत सर्व घटकांच्या क्षमतांचा विकास साधता येणे शक्य होईल. महाविद्यालयला या योजनेसाठी क्षमता विकसीत करण्याचे केंद्र (नोडल सेंटर) म्हणून काम करता येईल. याचा फायदा पुण्यातील सर्व महाविद्यालयांना होईल.”
आता महाविद्यालयातील प्रयोगशाळांचे नूतनीकरण करता येईल. प्रशासकीय कामासाठी व वैज्ञानिक संशोनासाठी अद्यायावत उपकरणे घेऊन संशोधनास गती देता येईल. ई-कंटेंट विकासासाठी स्टुडिओ व अर्काइव, स्मार्ट क्लासरुम, एन.ई.पी. राबविण्यासाठी कार्यशाळा, परिषद घेता येतील.
देशीय-आंतरदेशीय स्तरावरील उच्च शिक्षणातील कौशल्ये विकासासाठी कार्यक्रम, स्वयं आणि मूक कोर्सेससाठी मार्गदर्शन, ईंटर्नशिप, अप्रेंटीसशीप साठी एम्ओयु, आयक्युएसी मार्फत मूल्यमापन सुधारणा, शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी ‘जिज्ञासा’, स्टार्ट-अप, ईन्युबेशन सेंटर्स, व्होकेशनल कोर्स असे विविध कौशल्य विकासाचे कार्यक्रम भारतीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी महाविद्यालय करणार आहे.
या साठी महाविद्यालयीन स्तरावर डॉ. विनयकुमार यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले आहे तर त्यांना डाॅ शुभांगी जोशी,उपप्राचार्य, वाणिज्य,  प्रा. पराग शाह आयक्युएसी समन्वयक व डॉ. मनीषा बेले यांनी मदत केली.

डाॅ जोत्स्ना एकबोटे, मॅनेजमेंट काॅन्सिल मेंबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सहकार्यवाह पी ई सोसायटी यांनी महाविद्यालयाच्या या यशासाठी कार्याध्यक्ष प्रा डाॅ गजानन एकबोटे यांचे अभिनंदन केले.या यशात पी ई सोसायटीचे सेक्रेटरी प्रा शामकांत देशमुख यांचा मोलाचा वाटा आहे असे प्राचार्यांनी सांगितले.

See also  देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे- राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा