महाळुंगे (पाडाळे) येथे कलशारोहण सोहळा संपन्न

महाळुंगे : महाळुंगे (पाडाळे) येथील श्री हनुमान विठ्ठल रुक्मिणी मंदीरात कलशारोहण सोहळा  संपन्न झाला.या कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी मराठा समाजाचे  नेते  मनोज जरांगे पाटील व युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे  यांनी मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले.तसेच यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

देवाची आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्था व पंचक्रोशीतील वारकरी यांची सांप्रदायिक व नामघोषात राजमाता जिजाऊ चौक, दत्त मंदिर,श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य मिरवणुक काढण्यात आली.
युवा किर्तनकार हभप.चैतन्य महाराज वाडेकर यांची किर्तनसेवा संपन्न झाली. यावेळी पंचक्रोशीतील गायक ,वादक यांची साथसंगत लाभली.हभप.सिध्द सद्गुरु शांतीनाथ महाराज,हभप.परमपूज्य सद्गुरू राघव चैतन्य महाराज काटे(बाबा) यांच्या उपस्थितीत  कलशपूजन सोहळा संपन्न झाला याप्रसंगी महाळुंगे ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.
हभप निवृत्ती महाराज बोरकर(शास्त्री ) यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा संपन्न झाला.

हनुमान जन्मोत्सवानिमित्त ज्ञानेश्वर भजनी मंडळ व सत्संग महिला भजनी मंडळ यांची भजनसेवा संपन्न झाली.अखिल महाळुंगे गाव सेवा ट्रस्ट,श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळी महाळुंगे (पाडाळे) हे या कलशारोहण सोहळ्याचे निमंत्रक होते.

See also  बालेवाडीत "जन आशीर्वाद मेळाव्यात"  हजारोंच्या गर्दीसमोर सर्वसामान्यातील पाहुणे; चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर बालवडकर यांची नाराजी