गोखले बिल्डर्स यांनी ई-मेलद्वारे एच एन डी जैन होस्टेल ट्रस्टी यांच्याकडे व्यवहार रद्द करण्याची मागणी केली; प्रॉपर्टीवर जोपर्यंत ट्रस्टचे नाव लागत नाही तोपर्यंत लढा सुरू राहणार –  राजू शेट्टी यांची माहिती

पुणे : देशभरातील जैन समाजाच्या संस्थांच्या बैठकीनंतर गोखले बिल्डर्स यांनी ईमेल द्वारे HND जैन हॉस्टेल च्या ट्रस्टींना व्यवहार रद्द करण्याची मागणी केली असून 230 कोटी रुपये परत देण्याची देखील मागणी करण्यात आली असल्याचे कळवले आहे अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

HND जैन होस्टेल प्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह येत माहिती दिली. दुपारी देशभरातील 86 हुन अधिक जैन संस्थांच्या प्रमुखांची राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये ठराव करण्यात आला HND जैन होस्टेल विकण्याचा निर्णय ट्रस्टींनी घेतला आहे तो बेकायदेशीर आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील होस्टेलची साडेतीन एकर जागा विकणे हे अत्यंत लाजिरवाणी चुकीची गोष्ट आहे. हा जागेचा व्यवहार ट्रस्टींनी रद्द करावा अशी विनंती ट्रस्टी व गोखले बिल्डर्स यांना करण्यात येणार आहे असा ठराव या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

राजू शेट्टी म्हणाले, श्री गुप्ती नंदीजी महाराज तसेच नांदगिरी व कोल्हापूर मठाचे महाराज यांच्या उपस्थितीमध्ये  असे सांगण्यात आले की आंदोलनाची टोकाची भूमिका घेण्याअगोदर आपली भूमिका ट्रस्टी व बांधकाम व्यावसायिक यांना सांगावी. यानंतर एक तारखेला श्री गुप्ती नंदी जी महाराज यांनी उपोषण सुरू केल्यानंतर देशभर जैन समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येतील. याची जाणीव केंद्र व राज्य सरकारला करून देण्यात यावी असा निर्णय यावेळी बैठकीत झाला.

पुढे राजू शेट्टी म्हणाले, दरम्यान खासदार मुरलीधर मोहोळ यांनी माझ्याशी संपर्क साधून गोखले बिल्डर्स यांना हा व्यवहार थांबवण्यासंदर्भात विनंती केली असल्याचे सांगितले. त्यानुसार गोखले बिल्डर्स यांनी ट्रस्टींना मेल करून हा व्यवहार रद्द करावा व व्यवहारापोटी देण्यात आलेले 230 कोटी रुपये परत द्यावेत अशी मागणी मेल द्वारे केली आहे.

गोखले बिल्डर्स यांनी जरी व्यवहार रद्द करण्यासंदर्भात मेल दिला असला तरी जोपर्यंत हा विक्री व्यवहार रद्द होत नाही संपूर्ण मालमत्तेवर गोखले बिल्डर्स चे चढवण्यात आलेले नाव कमी होऊन पुन्हा ही प्रॉपर्टी ट्रस्टच्या नावावर होत नाही तोपर्यंत हा लढा संपणार नाही अशी माहिती यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

See also  वसुंधरा अभियान बाणेर, आयोजित रक्तदान शिबिर मध्ये 263 जणांचे रक्तदान

सोबत गोखले बिल्डर्स यांनी ट्रस्टींना ईमेल केलेली कॉपी चा स्क्रीनशॉट देखील जोडण्यात आला असून या व्यवहारातून गोखले बिल्डर्स बाहेर पडत असल्याचे माहिती देण्यात आली आहे.