महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ D2 यांनी ‘रस्ता सुरक्षा अभियान ‘

औंध  : ‘ महाराष्ट्र दिनाचे’ औचित्य साधत लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ D2 यांनी ‘रस्ता सुरक्षा अभियान ‘ Celebrity Campaign ‘ सह ब्रेमेन चौक औंध, पुणे येथे ट्राफिक ऑफिसर, औंध, अंकुर रुग्णालय, औंध व ह्याटेल भैरवी, औंध यांच्या सहकार्याने केले.


सिने अभिनेत्री क्रृतिका तुळसकर  ( रात्रीस खेळ चाले – शेवंता ) यांनी नियम पाळणारास गुलाबाचे फुल दिले तर नियम न पाळणारास  ट्राफिक ऑफिसर यांनी कोपरखळी वाले स्टीकर्स संबंधितांच्या वाहनास चिकटवले. आपत्कालीन वाहनास ( रूग्णवाहिका ) गर्दीतून रस्ता कसा देण्यात यावा यांचेही प्रात्यक्षिक त्यावेळी दाखविण्यात आले.


या कार्यक्रमास लायन DC मंदाकिनी माळवदे ( संयोजक ), लायन  डॉ. राजन कामत ( स्पान्सरर), लायन श्री. नितीन खोंड, ट्राफिक ऑफिसर श्री. एस. एस. पठाण व सहकारी, पोलिस ऑफिसर श्री. नांदे व सहकारी, डॉ. चिन्मय जोशी,संचालक, अंकुर रूग्णालय, औंध,व त्यांचे सहकारी, श्री. राहूल मुरकुटे व सहकारी, श्री. संजय कामत, सौ. चित्रा कामत, सौ. माधवी खळदकर, श्रीमती मानसी गोडबोले, अभिनेते अतुल मोरे, श्री. प्रतिक पाटील, श्री. राकेश सावंत, श्री. चंद्रशेखर पाटील व श्री. अनंत पाटील हे हजर होते.

See also  शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा