मागील दोन वर्षापासून सरकारी शाळेतील मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळत नसल्याने महापालिकेत आप चे आंदोलन

पुणे : आम आदमी पक्षाच्या वतीने आज पुणे महानगरपालिकेच्या आवारात सरकारी शाळेतील सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना मागील दोन वर्षापासून मोफत सॅनिटरी पॅड मिळत नसल्याने तीव्र आंदोलन केले गेले. यावेळी आंदोलनकर्त्या महिला कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध म्हणून आयुक्त विक्रमकुमार यांच्या गाडीवर प्रतिकात्मक स्वरूपात सॅनिटरी पॅड चिटकवून निषेध नोंदविला.

आम आदमी पक्षाच्या शिष्ट मंडळ आज आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेण्यासाठी गेले असता प्रथमता सुरक्षा रक्षकांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना महापालिकेच्या आवारात अडवून तुम्ही परवानगी घेतली आहे का? अशी विचारणा केली. तसेच आयुक्तांची भेट परवानगीशिवाय होणार नसल्याचे सांगितले. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी महापालिका आवारातच घोषणा देण्यास सुरुवात केली तसेच महापालिका आयुक्तांना निवेदनाबरोबरच देण्यासाठी आणलेले सॅनिटरी पॅड महापालिका आयुक्तांच्या गाडी वरती चिटकवले.

आम आदमी पक्षाचे युवा अध्यक्ष अमित मस्के म्हणाले हा सर्व प्रकार झाल्यानंतर सुरक्षारक्षकांनी आमच्यातील काही महिलांना आयुक्तांची भेट घेण्याची परवानगी दिली. महिला कार्यकर्त्या आयुक्त कार्यालयात गेल्या असता आणि त्यांनी आयुक्तांना सॅनिटरी पॅड का मिळत नाही असा प्रश्न विचारले असता आयुक्तांकडून सॅनिटरी पॅड चे वितरण सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली, परंतु महिला कार्यकर्त्यांनी सॅनिटरी पॅड मिळत नसल्याचे निक्षून सांगितल्यानंतर आयुक्तांनी संबंधित विभागाकडे चौकशी केली असता सॅनिटरी पॅड चे वितरण बंद असल्याची माहिती त्यांना कळाली. यानंतर आयुक्तांनी उद्यापासूनच सॅनिटरी पॅडचे वितरण करावे असे तोंडी आदेश संबंधित विभागाला दिले.

आम आदमी पक्षाच्या महिला अध्यक्ष सुरेखा भोसले म्हणाल्या, आयुक्त विक्रमकुमार हे प्रशासन प्रमुख आहेत खरे तर कुठल्या गोष्टी सुरू आहेत कुठल्या बंद आहेत याची माहिती त्यांना असायला हवी होती परंतु काही अधिकाऱ्यांकडून ज्या सुविधा बंद आहेत त्याची माहिती लपवली जात असल्याचे यावरून दिसते. नागरिकांना जर अशा प्रकारे अन्यायाला सामोरे जावे लागत असेल तर आम आदमी पक्षाकडून यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलने केली जातील.

पक्षाचे अध्यक्ष सुदर्शन जगदाळे म्हणाले नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलन केले म्हणून कार्यकर्त्यांवर जर गुन्हे पडणार असतील तर ही लोकशाहीची गळचेपी आहे. आम आदमी पक्ष हा नेहमी जनसामान्यांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडत असतो त्याचाच एक भाग म्हणजे आजच्या आंदोलन होते. कार्यकर्त्यांनी कुठलेही चुकीचे काम केलेले नाही.

राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले, मुळातच प्रशासनाने आपले काम व्यवस्थित केले नसल्याने कार्यकर्त्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली. महापालिकेच्या प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कोणाच्याही दबावाखाली न येता महापालिका प्रशासनाने खरे तर आरोग्य सेवा पुरवण्यासाठीचे टेंडर काढणे आवश्यक होते.

आम आदमी पक्षाच्या लीगल सेलचे सदस्य ॲड.अमोल काळे आणि ॲड.गणेश थरकुडे म्हणाले, आयुक्तांच्या भेटीनंतर आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महापालिका विभागातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नेले. व जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी केलेल्या आंदोलनाची परिणीती म्हणून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस ॲक्ट
खाली गुन्हे नोंदवण्याचे कारण सांगत त्यांना जवळजवळ चार तास डिटेल करून ठेवले गेले.आज जे आंदोलन केले गेले त्यामध्ये कुठलाही प्रकारचे शासकीय नुकसान कार्यकर्त्यांनी केले नव्हते, तरीसुद्धा कार्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नासाठी चार तास पोलीस ठाण्यात थांबवले गेले जे लोकशाहीच्या विरोधात आहे.

आम आदमी पक्षाच्या वतीने आजच्या आंदोलनासाठी युवा आघाडी अध्यक्ष अमित मस्के, महिला अध्यक्ष सुरेखा भोसले,महासचिव सतीश यादव,अक्षय शिंदे, महिला उपाध्यक्ष ॲनी अनिश, किरण कांबळे, छाया भगत, श्रद्धा शेट्टी, मनोज शेट्टी, पूजा वाघमारे, शाहीन अत्तार,पद्मा साळुंखे,तेहसीन देसाई ,सिमा टाक,शबाना शेख,रईसा सिद्धीकी,पुनम वाडकर,पायल वाडकर,विजय लोखंडे,मयुर कांबळे,अख्तार खान,शंकर थोरात,संजय कटारणवरे
जिबरील शेख,उमेश बागडे,

आम आदमी पक्ष
पुणे शहर मिडीया
अमोल काळे
9689898024
निरंजन अडागळे
9922999383

See also  सिद्धार्थ शिक्षण संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न