रक्तदान करून नववधू चढली बोहल्यावर.. वसुंधरा अभियान रक्तदान शिबिरात 207 रक्त पिशवी संकलन

बाणेर : वृक्षारोपण आणि संवर्धन कार्यासोबत सामाजिक उपक्रम अंतर्गत वसुंधरा अभियानचे 12 वे रक्तदान शिबिर एकूण 207 रक्त पिशवी संकलन महिला 23 तर 184 पुरुषांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले.

वसुंधरा अभियान बाणेर संस्था तुकाई टेकडीवर झाडे लावणे त्यांचे संवर्धन करणे यासोबतच सामाजिक उपक्रमात देखील सहभागी असते. तुकाई टेकडी बाणेर येथे संस्थेने ४५ ,०००  झाडे लावून जगवली आहे.  महाराष्ट्र शासनाने नुकताच  श्री शिव छत्रपती  वनश्री पुरस्कार देऊन संस्थेचा सन्मान केला आहे.
सामाजिक उपक्रम म्हणून दरवर्षी रक्तदान शिबिर घेऊन गरजू रुग्णांना जीवदान देण्याचे काम करीत आहे. 5 मे रोजी वसुंधरा सद्स्य चि.सौ.का. मानसी मोहन हिंगडे या मुलीचे लग्न होते. प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये तिचा सक्रिय सहभाग असतो. तिने या दिवशी रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केले. घरच्यांची आणि डॉक्टरांची परवानगी घेऊन या नववधूने शिबिराचे उद्घाटन करून प्रथम रक्तदान करून यांनी स्वतच्या लग्नासाठी रवाना झाली.  रक्तदान शिबिराचे दीपप्रज्वलन बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या सदस्यांच्या माध्यमातून करण्यात आले.


मुलीचे वडील मोहन हिंगडे  यांनी देखील रक्तदान केले. जनकल्याण रक्तपेढी मार्फत यावेळी रक्त संकलन केले गेले. दोन महिने अगोदर पासून नियोजन, प्रत्येक रक्तदात्याला वैयक्तिक संपर्क, रक्तदानाचे फायदे, महत्त्व, मार्गदर्शक सूचना  अशा प्रकारे अचूक नियोजन यामुळेच वसुंधरा अभियान अंतर्गत घेतलेल्या रक्तदान शिबिरात २०७ पिशवी रक्त संकलन झाले असे वसुंधरा सदस्यांनी सांगितले. झाडे जगवणे त्यांचे संवर्धन करणे यासोबतच माणसांचे जीव वाचवण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करून वसुंधरा अभियान समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करीत आहे.

See also  पंतप्रधान मोदींसाठी मोहोळांच्या संकल्पकनेतून साकारली खास ‘दिग्विजय पगडी’