चतुःश्रृगी पोलिस स्टेशन हद्दीतील अनधिकृत पब, रुफटफ हॉटेल व बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने करण्यात आली

पुणे  : चतुःश्रृगी पोलिस स्टेशन हद्दीतील अनधिकृत पब, रुफटफ हॉटेल व बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्याची मागणी संतोष गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, पुणे शहर विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष सुरज गायकवाड यांनी केली.

पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते त्या मध्ये विशेषतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच इतर शैक्षणिक, वाणिज्य,शासकीय, संरक्षण विभागाची कार्यालय आहे.नुकतेच पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या दुर्दैव दुर्घटने पुणे हलहले आहे.त्याची पुनरावृत्ती होवू नये यासाठी योग्य उपाय योजना पुणे शहर पोलीस व चतुःश्रृगी पोलिस स्टेशन यांनी कडून  करण्यात यावी.

चतुःश्रृगी पोलिस स्टेशन हद्दीतील प्रामुख्याने बाणेर,बालेवाडी औध, पाषाण सह अन्य भागात मोठ्या प्रमाणात पब, टेरेस (रुफटफ) हॉटेल अनधिकृतरित्या सुरु आहे. हे पव आणि हॉटेल रात्री उशिरापर्यत सुरु असतात. त्याठिकाणी सुरु असलेल्या कर्णकर्कश साउंड सिस्टीमचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच हॉटेल/पब मध्ये तरुणवर्ग मद्यधुंद होऊन बाहेर पडतो. त्यामुळे अनेकदा अनुसुचित घटना घडतात. तसेच अनेक ठिकाणी बेकायदा दारू विक्री, हुक्का पार्लर, मटका धंदा, पत्याचे क्लब, अमली पदार्थ विक्री, मसाज पार्लर व लॉजमध्ये चालणारे अनधिकृत व्यवसाय या सर्व अनधिकृत हॉटेल, पब व बेकायदा धंद्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

See also  जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आयोजित आधार, पॅन आणि मतदान कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; दर आठवड्याला राबवला जातो सोसायटीमध्ये उपक्रम