पेरीविंकल शाळेचा इ.10वी त देखील 100% निकालाचा डंका कायम

मुळशी : इ 12वी पाठोपाठ लगेच इ.10वी त सुद्धा 100% निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!
चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज च्या बावधन, पिरंगुट व  सुस या तिन्ही शाखेचा शै.वर्ष 2023-24 बॅच चा इयत्ता 10वी चा निकाल 100% लागला असून 10वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उज्जवल यशाबरोबरच मागील  वर्षाप्रमाणेच 100% निकालाची परंपरा कायम ठेवून  बाजी मारली आहे.

यंदाच्या 10वी च्या परीक्षेत पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बावधन येथून एकूण 78, पिरंगुट येथून 85 तर सुस येथून 40 असे एकूण 203 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून पिरंगुट संचिता केसकर हिने 94.50% मिळवून प्रथम स्थान पटकवून बाजी मारली तसेच समृद्धी साबळे हिला 90.80% गुण मिळवून द्वितीय स्थान प्राप्त झाले व सानिया बेलुंकी हिने 89.20%गुण पटकवून तिसरे स्थान पटकवले आहे.

तसेच बावधन शाखेतून नील अर्जुने याने 92.60% मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान पटकवला आहे तर सेजल सुपेकर हिला 91% गुण मिळून द्वितीय स्थान प्राप्त झाले असून श्रावणी दरोडे हिला 90.40% गुण असून तृतीय स्थान प्राप्त झाले आहे.

तसेच सुस शाखेतून स्वरा चौधरी हीने 88% गुण प्राप्त करत अव्वल स्थान पटकावले. तर कुसुम कुमावत हीने 84.60%गुण संपादन करून द्वितीय क्रमांक मिळवला असून साक्षी राठोड हीने 82.40% गुण मिळवून तृतीय स्थान पटकवून बाजी मारली आहे.
सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम क्रमांकाने उत्तीर्ण होवून विद्यालयातील सर्व शिक्षक यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा व  त्यांना तशीच सार्थ साथ देणारे सर्वच विद्यार्थी आणि पालकवर्ग यांच्या परिश्रमाचे चीज म्हणजेच आजचा हा 100% निकाल होय असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल यांनी केले.

या निकालामागे शिक्षक, विद्यार्थी व पालक या सर्वाना कायम पाठिंबा असणारे शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर , तसेच संचालिका सौ रेखा बांदल यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, पेरिविंकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सुस शाखेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित, पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक डॉ अभिजित टकले व बावधन च्या मुख्याध्यापिका स्वाती कोल्हे यांचे अभ्यासपूर्ण नेतृत्व तसेच  वर्गशिक्षिका विद्या झोपे , राजश्री थोरात, उज्वला, योगिता धाने, पर्यवेक्षक पूनम पांढरे, सना इनामदार,सचिन खोडके, नेहा मालवदे तसेच सर्व वर्गशिक्षक व विषयशिक्षक या सर्वांची जिद्द व चिकाटी यांचा मिलाप व सहकार्य आणि उच्च विद्या विभूषित आणि अनुभवी शिक्षकवृंद , तसेच या सर्व वातावरणात आपले १००% प्रयत्न देणारे विद्यार्थी या सर्वाच्या एकत्रित प्रयत्नानेच हे यश प्राप्त करू शकल्याची दिलखुलास शाबासकीची थाप सर्वांनी दिली.

आजच्या या उत्तुंग यशाचे मानकरी असलेले विद्यार्थी आणि शिक्षक यांचा पुष्पगुछ व पेढे देऊन शाळेचे संस्थापक अध्यक्ष   मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ रेखा बांदल आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आणि त्यांना त्यांच्या भावी उच्च शिक्षणासाठी व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.   online निकाल लागल्यावर लगेचच गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक साजरे करण्यासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष जातीने उपस्थित राहिले.

See also  परदेश शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन