प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजीनगर, पुणे ५ या संस्थेच्या७ शाळांचा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल १०० टक्के

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाच्या इ. १०वी च्या परीक्षेत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना घवघवीत यश मिळाले आहे. संस्था संचलित १० शाळांपैकी ७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

अ. क्र. शाळेचे नाव निकाल (%) शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थी / विद्यार्थिनीचे नाव गुण (%)
१ मॉडर्न हायस्कूल (इंग्रजी माध्यम), शिवाजीनगर, पुणे ५ १००% सुमेध माने ९७.४०%
२ मॉडर्न हायस्कूल, गणेशखिंड, पुणे १६ १००% अनुष्का वावरे ९६.६०%
३ मॉडर्न हायस्कूल (इंग्रजी माध्यम), पाषाण, पुणे ८
१००% तनिष्का पवार ९६.४०%
४ मॉडर्न हायस्कूल (इंग्रजी माध्यम), निगडी, पुणे ४४ १००% सार्थक आव्हाड ९३.८०%
५ मॉडर्न हायस्कूल, वारजे, पुणे ५८ १००% प्रेम चव्हाण ९३.२०%
६ मॉडर्न हायस्कूल (इंग्रजी माध्यम), वारजे, पुणे ५८ १००% मानव बिरादार ९२.६०%
७ मॉडर्न हायस्कूल, भोसे, ता. खेड, जि. पुणे   १००% कल्याणी खोल्लम ९२.२०%
८ मॉडर्न हायस्कूल, निगडी, पुणे ४४ ९८.९१% श्रावणी धामणे ९६.२०%
९ मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर, पुणे ५ ९८.६०% ओम जेट्टे ९५.४०%
१० पी.ई.एस. गर्ल्स हायस्कूल, शिवाजीनगर, पुणे ५ ९६.५७% श्रध्दा पाटील ९६.२०%


या सर्व शाळांमध्ये तळागाळातील, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या ८० टक्के हून अधिक आहे. संस्था संचलित सर्व शाळा व महाविद्यालये दर्जेदार गुणवत्तेबद्दल प्रसिद्ध आहेत. संस्था गेली ९० वर्षे एक लखलखीत शिक्षण परंपरा आणि गुरुजनांनी घालून दिलेले आदर्श पाळत आहे. 

या उज्वल यशामध्ये संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे यांचे मोलाचे मार्गदर्शन नेहमी लाभत असते. संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे, कार्यवाह मा. प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह मा. प्रा. सुरेश तोडकर, मा. प्रा. डॉ. सौ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा. डॉ. प्रकाश दीक्षित, प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी या सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मन:पूर्वक अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

See also  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर