पुण्यातील निसटता विजय भाजपाला आव्हान ठरू शकतो

पुणे : निवडणुकिचा शेवटचा टप्पा पार पडल्यावर जाहीर झालेल्या एक्झिट पोल मुळे NDA व विशेषतः भाजपा पक्षात जरी उत्साहाचे वातावरण असले तरी व्यक्तीगत पातळीवरील उमेदवारांची धाकधुक काही संपलेली नाही. पुण्यासारख्या जागेवर सुरुवातीला एक तर्फी वाटणारी निवडणुक रंगतदार झालेली पहायला मिळाली. पुढील काही महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभा व पुणे महानगरपालीच्या दृष्टीने या निकलाचे विविध अंगाने विश्लेषण केले जाईल.

काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांनी भाजपाच्या उमेदवाराला निवडणुकीत शेवटच्या चेंडुपर्यत लढत ठेवले हे निश्चीत. समाज माध्यमांमधील प्रतिक्रीयांवरुन पुणे अगदीच ५० ५० % नसली तरी ६० ४० % नक्कीच आहे.  शहर काँग्रेसचे या निम्नीत्याने झालेले पुनर्जीवन विशेष अधोरेखित करणारी गोष्ट म्हणावी लागेल. काँग्रेस पक्षाने पारंपारीक त्याच त्याच उमेदवारांन एैवजी नवा लढवय्या उमेदवार दिल्याने चांगली लढत पहायला मिळाली. ओबीसी असल्याने धंगेकरांना त्याचा फायदा नक्कीच होईल असे दिसते.
मराठा आंदोलना मुळे एका बाजुला ओबीसी एकवटलेला दिसत होता. असे दिसत असतानाच भाजपाने मराठा उमेदवार दिल्याने ओबीसी किती भक्कमपणे धंगेकरांच्या पाठीशी उभारतो हे पहावे लागेल. तसेच मराठा समाजाने भाजपा विरोधात घेतलेली भूमिका, याचा किती फायदा काँग्रेस पक्षाला होईल हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सेना फुटली, राष्ट्रवादी फुटली परंतु काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व वरिष्ठ अशोक चव्हाण भाजपात जाऊनही त्यांचे जवळचे मानले जाणारे असे कोणीही कॅांग्रेस सोडुन गेले नाहीत ही कॅांग्रेसाठी समाधानाची बाब ठरली.


राष्ट्रवादी फुटल्याने अजीत दादांच्या नगरसेवकांचा फटका धंगेकराना बसेल असे वाटत असताना प्रत्यक्षात जमिनीवर मात्र तसे चित्र दिसले नाही. त्यामुळे लढतींमधील रंगत वाढलेली आहे अशी चर्चा आहे. मुस्लिम समाजातील काही नेते मागील काळात घरवापसी करत परत कॅांग्रेसधे आल्याचाही फायदा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला होईल. पुण्यातील  मध्यम वर्ग व एकुण मतदारांपैकी ४० टक्के  वस्ती व झोपडपट्टीतल राहणाऱ्या मतदारांवर महागाई व बेराजगारी सारख्या गोष्टींचा किती प्रभाव पडला हे ४ तारखेच्या निकालावरुन दिसुन येईलच.

See also  महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजू

ठाकरे सेनेची शहरातील जवळ जवळ ७० ते ८० हजार मते काँग्रेस पक्षाच्या पदरात पडतील. असे असले तरी मागीले दोन्ही वेळेचा जवळपास ३ लाखाचा फरक भरुन काढण्याचे मोठे आव्हान काँग्रेस पक्षाला पार पाडायचे आहे.


दुसऱ्या बाजुला भाजपाने मुरलीधर मोहळ सारखा नुकतेच महापौर पद भुषवलेला उमेदवार दिल्याचा फायदा पक्षाला होईल. महापौर काळात मोहोळांचा चांगला संपर्क शहरात पहायला मिळाला. त्याचा फायदा निवडणुकी दरम्यान मोहोळ यांना मिळाला असल्याचे दिसून आले.
मोहळाच्या रुपाने मराठा उमेदवार देऊन भाजपाने मराठा आंदोलनामुळे निर्माण झालेले विरोधातील वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. नाराज असलेल्या मेधा कुलकर्णीनां राज्यसभा दिल्याने त्यांच्याशी संबंधीत मोठ्या वर्गाची नाराजी दुर झाली. परंतु राष्ट्रवादी सोबत युती केल्याने काहीशी नाराजी देखील पाहायला मिळाली.
पुण्यासारख्या शहरात ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधीत्व करणारा एकही आमदार नसल्याची खंत होती ती नाराजी मेधाताईंच्या खासदारकीने दुर झाली.
एैनवेळी मिळालेल्या मनसेच्या पाठींब्याचाही फायदा होईलच.
भाजपाचा पारंपारीक मोठा मतदार वर्ग तर होताच शिवाय मागील १० वर्षात तरुण मतदार मोठ्या प्रमाणावर भाजपा व मोदी ब्रॅंड शी जोडला गेला असल्याने त्याचाही फायदा हा भाजपच्या मुरलीधर मोहळ यांना होईल. मागील दोन्ही निवडणुकीत मिळालेले मताधिक्याच अखेरीस निर्णायक ठरु शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

असे सर्व असले तरी पुण्यासारख्या भाजपाचे वर्चस्व असलेल्या मतदार संघात एव्हढी चुरशीची लढत होणे हे भविष्यात भाजपासाठी धोक्याची घंटा ठरु शकते. विजयी उमेदवार कोणीही असला तरी एव्हान एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की विजयी व पराभूत उमेदवारांमधील मतांचे अंतर हे फार जास्त असणार नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना विजयाच्या पलिकडील बरच काही मिळवायचे व टिकवायचे आहे.

धंगेकर जिंकले तरी येत्या विधानसभा व महापालीके पर्यंत तो उत्साह व आघाडीतील ताळमेळ कायम ठेवण्याचे आव्हान कॅांग्रेस पुढे असेल.
दुसर्या बाजुला भाजपाचे मोहळ जरी जिंकले तरी त्यांना नुसता विजय पुरेसा नसेल. त्यांना मागील दोन्ही वेळेसचे मताधिक्य टिकवावे लागेल. अन्यथा त्यांचा निसटता विजय हा सुध्दा विरोधकांना नविन उत्साह देणारा ठरु शकतो जो पुढील काळात शहरात भाजपला मोठे आव्हान निर्माण करु शकतो.