बालेवाडी परिसरात झळकले मुरलीधर मोहोळ यांच्या शुभेच्छांचे बॅनर

पुणे : लोकसभा निवडणुकीची उद्या दिनांक 4 जून रोजी मतमोजणी आयोजित करण्यात आली आहे. निवडणुकीच्या निकाला अगोदरच पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असलेले भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे कार्यकर्त्यांनी लावले असून बालेवाडी परिसरात मध्ये देखील बॅनर लावण्यात आले आहे.

पुणे लोकसभा मतदार संघातील निवडणूक चुरशीची मानली जात असून निवडणुकीच्या निकालाचे अंदाज एक्झिट पोल च्या माध्यमातून वर्तवण्यात आले आहेत. यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा विजय निश्चित मानला जात असल्याचे एक्झिट पोल मध्ये सांगितले जात असल्याने कार्यकर्त्यांनी निकाला आधीच विजयाचे बॅनर झळकावले आहेत.

बालेवाडी परिसरामध्ये भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष शिवम बालवडकर व त्यांच्या मित्र परिवाराने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची खासदार पदी निवड झाली असल्याचे शुभेच्छा बॅनर झळकावले आहे. यामुळे मतमोजणी दरम्यान कोणाला किती वेळ मिळणार याची उत्सुकता शिगेला लागली आहे.

See also  संकल्प यात्रेच्या नावे मोदींची हमी नव्हे जुमलेबाजीच! - आम आदमी पार्टी