आकड्यांच्या पलिकडचा एक्झिट ट्रेंड काय?

पुणे : एक्झिट पोलोचे आकडे जरी एका बाजुने झुकलेले दिसत असले तरी काही एक गोष्टी या आकड्यांच्या विरोधात्मक चित्र निर्माण करणाऱ्या आहेत. २०१९ च्या तुलनेत भाजपा २०२४ ला काही जास्तीच्या जागा लढवत आहे.जास्त जागा म्हणजे जास्त वोट शेर. ह्या वाढीव जागा तुलनेने कमी असल्या तरीही
एक्झिट पोल मधे सांगीतल्या प्रमाणे भाजपाचा वोट शेर हा ३७ टक्के वरुन ४० टक्के वर जातो आहे. वाढीव लढलेल्या जागा हे एक कारण व एकुणच वाढलेल्या मतदारांचा ही आकडा हे दुसरे कारण असेल भाजपाच्या वाढल्या वोटशेरचे.

या उलट लक्षणीय गोष्ट अशी की काँग्रेस मात्र २०१९ च्या तुलनेत जवळ जवळ १३० कमी जागा लढवत आहे. २०१९ ला ४२१ जागा लढवल्या होत्या या वेळी लोकसभेच्या केवळ २८५ एव्हढ्याच जागा लढवत आहे. असे असुनही काँग्रेस चा वोट शेर हा कमी होऊन १२ ते १३ % पर्यंत खाली येणे अपेक्षीत होते मात्र सर्वेक्षणात हा वोट शेर  वाढलेला दिसतो हे कमालीचे आहे.
२०२४ ला कॅांग्रेस चा हा वोट शेरचा आकडा सर्वेक्षणात १९ टक्क्यां वरुन २२ टक्क्यांवर गेलेला आहे.


म्हणजे २०१९ च्या तुलनेत कमी जागा लढऊनही जर वोटशेर ४ टक्के वाढत असेल तर हा ट्रेंड आहे असे म्हणायला जागा आहे.
सरासरीत हो वोटशेर ८ ते ९ टक्क्यांनी वाढला असे म्हणावे लागेल.
भाजपाच्या ४० टक्के वोटशेर पेक्षा हा २३ टक्क्यांचा कॅांग्रेस आकडा कमी असला तरी त्याचे वेगळे परिणाम मतांच्या व जिंकण्याच्या गणितावर होणारा असु शकतो.

हाच वाढलेला वोट शेर काँग्रेसला मागील वेळी कमी फरकाने हारलेल्या जागा जिंकण्यास मदत करेल का हा कुतुहलाचा विषय आहे. २०१९ ला काँग्रेसचे ५२ खासदार जिंकून आले होते व जवळजवळ २०० जागा अशा होत्या जिथे काँग्रेस ही दुसर्या स्थानावर होती. या २०० जागांपैकी किती जागा काँग्रेस यावेळी जिंकते आहे त्यावरच पुढची गणिते अवलंबुन आहेत. या २०० पैकी किमान ४०- ४५ जास्तीच्या जागा तरी काँग्रेस जिंकु शकते असे या वोट शेर वरुन दिसते. त्यामुळे काँग्रेस १०० चा आकडा गाठू शकते. आणि जर हे झाले तर ट्रेंड काय होता हे लक्षात घेता येईल आणि सहाजीकच काँग्रेसच्या मित्र पक्षांच्याही जागा वाढलेल्या दिसतील.

राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा काहीच परिणाम मतदानावर झाला नसेल असे ही म्हणणे भारतीय लोकांच्या सद्भावनेच्या जिवनशैलिवर प्रश्न निर्माण करणारे ठरेल. पेट्रोल, सिलेंडर च्या किमतीचा महागाईचा परिणाम झाला नसेल असे नाही . मावळत्या सरकारवर नाराजी असने ही एक सामान्य स्थिती असते.
त्यामुळे कोणाला किती जागा मिळतील यापेक्षा जनभावणा काय होती याचा हा एक्झिट ट्रेंडच आहे असे म्हणावे लागेल.

See also  अन्य राज्यातून आयुर्वेद पदवीधारक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून संधी मिळणार