महाड सत्याग्रह दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यक्रम

 

पुणे : विवेक विचार मंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि मराठी विभाग संयुक्त विद्यमाने, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या, 20 मार्च महाड सत्याग्रह दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा विषय ‘ “महाड सत्याग्रह आणि सामाजिक समतेचा लढा” हा होता. कार्यक्रमाची सुरुवात ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करून आणि संविधानाची उद्देशिका वाचून करण्यात आली. मराठी विभागाच्या वतीने प्राध्यापक डॉ. प्रभाकर देसाई सरांनी कार्यक्रमाला उद्देशून प्रस्तावना सादर केली. तसेच विवेक विचार मंच च्या वतीने डॉ कुंडलिक पारधी व प्राध्यापक सुधाकर अहिरे यांनी, विवेक विचार मंच बद्दल थोडक्यात प्रस्तावना दिली. त्यानंतर आलेले प्रमुख पाहुणे माजी खासदार अमर साबळे यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष बागेश्री मंठाळकर यांच्या हस्ते विद्यापीठ सन्मानचिन्ह आणि शाल देऊन करण्यात आला. तसेच इतर मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, अमर साबळे यांनी महाड सत्याग्रह आणि सामाजिक समतेची लढा याचा संपूर्ण इतिहास मांडला. साबळे साहेबांनी आपल्या भाषणाची सुरवात प्रेरणादायक अशा वाक्याने केली
“अंधाऱ्या काळोखात पांढऱ्या प्रकाशाची रेघ ओढावी त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या जीवनात महाडचा सत्याग्रह करून प्रकाशाची वात पेटवली” या कार्यात इतर जातीधर्मांनी व वि. दा. सावरकर यांनी कसा पाठिंबा दिला तेही सांगितले. आपण हा दिवस प्रेरणा दिवस, अहिंसा व शांततेचे प्रतीक म्हणून कसा साजरा करू शकतो याबद्दल ही मार्गदर्शन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वापर करून कसा खोटा इतिहास पसरवला जातो हेही सांगितले. आजच्या युवकांना डिजिटल वर्ल्ड मध्ये कसे जगले पाहिजे, याबद्दल ही मार्गदर्शन केले. बाबासाहेब हे मानवतावादी, अहिंसावादी आणि भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते होते, या वाक्याने भाषणाचा समारोप केला. सूत्रसंचालन प्राध्यापक सुधाकर अहिरे यांनी केले.

See also  महाराष्ट्रात कधीही नव्हता तो राजकीय द्वेषाचा घाणेरडा पायंडा तुम्ही पाडताय -रोहित पवार