पुणे बुलेटिन ने निवडणूक निकालाचा साधला अचूक अंदाज.

पुणे : काँग्रेस १०० गाठेल, काँग्रेस च्या  मतांमध्ये  ८ ते  ९ टक्क्यांची वाढ आणि काँग्रेस  मित्र पक्षांच्या जागा वाढतील अशा पद्धतीने केलेले विश्लेषण व वर्तवलेली शक्यता कालच्या निकालावरून  अचूक ठरली.
पत्रकार केदार कदम व त्यांच्या सहकार्यांनी सर्व एक्झिट पोल ची माहिती व त्यातील सामान व विरोधी बाबींचा अभ्यास करून ज्या गोष्टी विश्लेषणातून निसटल्या होत्या त्या अचूक हेरून आपल्या ३ जूनच्या बातमी मध्ये याचे विश्लेषण केलेले होते.

आकड्यांच्या पलिकडचा एक्झिट ट्रेंड काय? या शीर्षकाखाली मतदारांचा कल कोणत्या बाजूने आहे याचा अंदाज व्यक्त केला होता.

कालच्या निकालानंतर अनेक मान्यवर व जेष्ठ नागरिक वाचनकांनी निकालानंतर पुणे बुलेटिनचे विशेष अभिनंदन केले व पत्रकारितेतील त्यांच्या स्वतंत्र व अभ्यास पूर्ण वाटचालीला शुभेच्छा  हि दिल्या.

See also  अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉट’चे संयुक्त सर्वेक्षण करत उपाययोजना निश्चित करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख