सुसच्या पेरिविंकल शाळेत “एक घरटी एक झाड”संकल्पनेने पर्यावरण दिन उत्साहात साजरा

सुस – चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सुस शाखेत बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “एक घरटी एक झाड” हा संकल्प करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला . महानगर पालिकेच्या प्रकल्पला हातभार लावण्यासाठी पेरिविंकल इंग्लिश मिडीयम अँड ज्युनियर कॉलेज च्या सुस शाखेच्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांकडून  101 झाडें घेऊन घरोघरी म्हणजेच प्रत्येक घरटी एक झाड भेट देऊन ते लावून त्याची निगा घेऊन झाड जगवून वृक्ष संवर्धनाचा एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. काही मोठी झाडें उदा. चिंच, औदुंबर, आंबा, फणस, पेरू अशी सुस च्या टेकडीवर वृक्षारोपण करून लावण्यात आली. नुकत्याच झालेल्या सायकल दिन व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढून सर्व गावाकऱ्यांना जनजागृती केली.


कार्यक्रमाचा शुभारंभ   शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित, पर्यवेक्षक सचिन खोडके व नेहा माळवदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. आजच्या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून इ 9वी, 10वी व 12वी च्या विद्यार्थ्यांकडून यामध्ये पर्यावरण जनजागृतीचे अनेक उपक्रम सादर करण्यात आले.
सर्वप्रथम सायकल दिनाचे औचित्य साधून व वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण याला आळा घालण्यासाठी जवळच्या कामांसाठी सायकल चा वापर करावा याबद्दल जनजागृती करून सर्व ग्रामस्थांना सायकल रॅली द्वारे पर्यावरण प्रदूषण मुक्त करण्याचा संदेश देण्यात आला. तसेच प्रत्येक घरटी एक झाड या संकल्पनेद्वारे घरोघरी जाऊन एक रोप अशा प्रकारे 101 रोपांचे वाटप करून झाडे जगवण्याचा संदेश देण्यात आला.  विद्यार्थ्यांनी घोषवाक्यद्वारे पर्यावरणाविषयी संपूर्ण गावात जागृती निर्माण केली. इयत्ता नववी आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून “झाडे लावा आणि झाडे जगवा “हा मोलाचा संदेश सर्वांना दिला .पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांची निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांद्वारे टेकडीवर जाऊन वृक्षारोपण करण्यात आले. अशाप्रकारे विविध उपक्रम राबवून एक घरटी एक झाड या संकल्पनेने आजचा आगळा वेगळा पर्यावरण दिन साजरा करण्यात आला .

See also  काँग्रेसचे पंतप्रधान मोदींना ९ साल,९ सवाल पुस्तिकेचे विमोचन


या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल व शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ. निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षक सचिन खोडके सर, नेहा माळवदे, क्रीडा शिक्षक मोरे सर तसेच सर्व शिक्षकांच्या सहकार्याने आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले.