पुणे : रामायणाचे प्रत्यक्ष जिवंत चित्ररूप दर्शवणारे विविध रागातील गीत, शास्त्रीय संगीतातून अत्यंत सुरेल अशा आवाजामध्ये झालेले सादरीकरण. रामायणातील विविध भाग म्हणजेच श्रीरामांचा जन्म, सीता स्वयंवर, राम शौर्य वर्णन, भरत आक्रोश, शुर्पनखा ञागा, राम सेतू निर्मिती, राम विजया नंतर पुन्हा अयोध्येमधील आगमन हा संपूर्ण भाग सादर होत असताना उपस्थित सर्व मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी, खराडी, पुणे येथे आयोजित दत्ताजी चितळे यांच्या ‘गीत रामायण’ या कार्यक्रमाचे.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सागर ढोले पाटील,माजी आमदार कमलताई उल्हास ढोले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संस्थेच्या सेक्रेटरी उमा सागर ढोले पाटील यांच्या समवेत शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते.
‘गीत रामायण’ सादरीकरणात दत्ताजी चितळे यांच्यासामावेत गायक तुषार रिठे, प्रार्थना साठे, डॉ. भक्ती दातार, अमिता घुगरी, वादकः अमित कुंटे, दीप्ती कुलकर्णी, ओंकार पाटणकर, उद्धव कुंभार यांचा सहभाग होता. तर कार्यक्रमाचे निवेदन मृणालिनी चितळे यांनी केले.
ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक, स्टाफ, विद्यार्थी व पालक व्रृंद, पुणे पूर्व विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.