वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा गैरव्यवहाराची प्रकरणी विशेष चौकशी स्थापन करावी!: आम आदमी पार्टी

पुणे : चार जून रोजी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या संधीसाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेचे निकाल लागले आहेत परंतु त्याच्यामध्ये अनेक संशयास्पद पद्धतीचे मार्ग दिले दिलेले आहेत. त्यामुळे आम आदमी पार्टी ने या सर्व प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली विशेष तपास समिती स्थापन करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा तसेच आवश्यकता भासल्यास ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.

पाच मे रोजी 5000 केंद्रांवर साधारणपणे 24 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि यंदा 4 जूनला लोकसभेचे मतमोजणी चालू असण्याच्या दिवशीच याचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यामध्ये जवळपास 67 मुलांना टॉप ठरवण्यात आले असून सर्वांना 720 मार्क दिले गेले आहेत. त्यातील सहा विद्यार्थी एकाच केंद्रातील आहेत. तसेच काही मुलांना ग्रेसमार्क दिले गेले आहेत अशी याबाबतीत नॅशनल टेस्टिंग एजन्सी या परीक्षा घेणाऱ्या संस्थेने स्पष्टीकरण दिले आहे. परंतु लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ज्या परीक्षेवर अवलंबून आहे अशा मुलांतील सुमारे 1500 मुलांना असे ग्रेसमार्क दिले गेले असल्यामुळे इतरांवरती हा अन्याय होणार आहे. या परीक्षेच्या संदर्भात तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात सुद्धा पेपर फुटी, भ्रष्टाचार याचे आरोप महाराष्ट्रात केले गेले आहेत. तलाठी परीक्षा, पोलीस, वनविभाग, आरोग्य, जलसंपदा या सर्वच विभागातील निवडीच्या संदर्भात लाचखोरीचेही आरोप केले गेले आहेत.  विद्यार्थ्यांमध्ये याविषयी तीव्र संताप आहे.
आता या नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेतलेल्या नीट परीक्षेमधील निकाल हे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत आणि इतर राज्यातील मुलांना चांगले मार्क दिले गेले असल्यामुळे महाराष्ट्रातील मुलांवरही अन्याय होणार आहे.


विविध राज्यांमध्ये या स्पर्धा परीक्षा म्हणजे भ्रष्टाचाराचे ठिकाण ठरत आहेत तर काही ठिकाणी त्याला संघटित गुन्हेगारीचे स्वरूप येताना दिसत आहे. गुजरात, बिहारमध्ये, हरियाणा, मध्यप्रदेश मध्ये या पद्धतीचे प्रकरणे पुढे आलेली आहेत. नीट परीक्षेच्या दरम्यानही बिहारमध्ये पेपर फुटी वरून 13 जणांना तर गुजरात मध्ये तीन जणांना अटक करण्यात आली परंतु त्या संदर्भात कुठलेही स्पष्टीकरण सरकारने दिलेले नाही. त्यामुळे या प्रकरणांमध्ये काही लपवण्याचा प्रयत्न होतो आहे अशी शंका घेण्यात जागा आहे.

यामुळेच आम आदमी पार्टीने या संदर्भात न्यायालयाच्या देखरेखी खाली विशेष तपास समितीमार्फत चौकशी आणि गरज पडल्यास पुनर्परीक्षा घेण्याची मागणी मुकुंद किर्दत, प्रदेश प्रवक्ते, आम आदमी पार्टी यांनी केली आहे.

See also  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवलाल धनकुडे यांच्या घरी सदिच्छा भेट