मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड येथे ‘मॉडर्न ट्रेकिंग क्लब’ ची स्थापना

पुणे : मॉडर्न कॉलेज गणेशखिंड, पुणे येथे ‘मॉडर्न ट्रेकिंग क्लब’ स्थापन करण्यात आलेला आहे. क्लबतर्फे नुकताच कात्रज बोगदा ते सिंहगड किल्ला गिरिभ्रमण आयोजित करण्यात आले होते. या ट्रेकमध्ये 160 विद्यार्थी व 15 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

पहिला हत्ती डोंगर हा अवघड टप्पा लवकरच पार केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बारा डोंगर पार केले. गटागटाने चालताना शिक्षक, सेवक व काही माजी विद्यार्थीही सहभागी झाले होते. ट्रेक दरम्यान डॉ प्राची क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गावरील वनस्पतींची माहिती दिली. तसेच भुगोलशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

विद्यार्थ्यांमध्ये गिरीभ्रमण विषयी आवड निर्माण व्हावी तसेच ट्रेकिंग क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निसर्ग अभ्यासण्याची मदत व्हावी या उद्देशाने या ट्रेकिंग क्लब ची स्थापना करण्यात आली आहे.

See also  मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा - शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना. दीपक केसरकर