सोमेश्वर मित्र मंडळाच्या वतीने माजी आमदार विनायकशेठ निम्हण यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरात 77 जणांचे रक्तदान

पाषाण : सोमेश्वर मित्र मंडळाच्या वतीने स्व.माजी आमदार विनायकशेठ निम्हण ह्यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.ह्या रक्तदान शिबिराचे उदघाटन माजी नगरसेवक प्रमोद निम्हण ह्यांच्या हस्ते करण्यात आले .मंडळाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. मंडळाने आयोजित केलेले हे 9 वे रक्तदान शिबीर आहे.ह्या रक्तदान शिबीरात 77 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग घेतला.

यावेळी मंडळाचे मार्गदर्शक श्री जयवंतशेठ निम्हण , श्री राजाभाऊ सुतार व मंडळाचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. माजी नगरसेवक, सामाजिक , शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेट दिली.सोमेश्वर मित्र मंडळ सामाजिक, शैक्षणिक ,पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना मदत करण्यात आघाडीवर असते.ह्या वर्षी मंडळाच्या वतीने आपल्या भागात पाषाण बाणेर टेकडीवर हरित कार्य करत असलेल्या ” वसुंधरा अभियान ” ह्या संस्थेचा गौरव करण्यात आला .तसेच ह्या कार्यासाठी मंडळाच्या वतीने 11000रु ची देणगीही देण्यात आली.


सार्वजनिक गणेशोत्सव फक्त कार्यकर्त्यांपुरताच मर्यादित न राहता त्यामध्ये सहकुटुंब सहभागी होता यावे म्हणून आमचे मंडळ दरवर्षी प्रयत्न करत असते.ह्यासाठी आमच्या मंडळाच्या वतीने मंडळातील सर्व महिलांच्या हस्ते महाआरती चे आयोजन करण्यात आले होते.ह्याप्रसंगी महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

See also  संगीत रंगभूमी पुनर्जीवित करण्यासाठी नवीन संगीत नाटकं रंगभूमीवर येणे गरजेचे - विजय गोखले