पुणे : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री पदी वर्णी लागणार आहे. पुणे भाजपामध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खासदार मुरलीधर मोहोळ यांची राजकीय वाटचाल पुढीलप्रमाणे
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक…
– गणेशोत्सव मंडळाचे सक्रिय कार्यकर्ता…
– बूथ प्रमुख म्हणून भाजपामध्ये कामाला सुरुवात…
– युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवपदाचीही संधी…
– संघटनेत ३० वर्षे कार्यरत…
– सांस्कृतिक-क्रीडा क्षेत्रातही योगदान…
– २००२, २००७ आणि २०१७ साली कोथरुडमधून नगरसेवक
– २०१७ : साली स्थायी समिती धुरा…
– २०१९ : पुण्याच्या महापौरपदीसंधी…
– कोरोना काळात विविध पातळ्यांवर ैभरीव काम
– २०२० : अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी…
– २०२२ : सरचिटणीस, महाराष्ट्र भाजपा
– २०२२ : पश्चिम महाराष्ट्राची भाजपाची जबाबदारी
– ४ जून, २०२४ : खासदार, पुणे