पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्री मंडळात
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कडे सहकार
आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार
सोपविण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्म मधील मंत्री
मंडळाच्या खाते वाटपाची नुकतीच घोषणा करण्यात आली.
यावेळी राजनाथ सिंह यांच्या कडे संरक्षण, अमित शहा
यांच्या कडे गृह, निर्मला सीतारामन यांच्या कडे अर्थ तर
नितीन गडकरी यांच्या कडे रस्ते, परिवहन मंत्री पद कायम
ठेवण्यात आले आहे.
पुण्याचे नगरसेवक, महापौर, खासदार ते पहिल्याच टर्म मध्ये
केंद्रीय राज्य मंत्री पदाची संधी मुरलीधर मोहोळ यांना
मिळाली. काल शपथविधी सोहळा पार पडल्या नंतर आज
सायंकाळी मोदी यांच्या मंत्री मंडळातील खाते वाटप जाहीर
करण्यात आले आहे. यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर
मोहोळ यांना सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री
पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.