हिंदू संस्कृतीत दुसऱ्याबद्दल सकारात्मक विचार करण्याचं तत्त्वज्ञान – ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

पुणे : हिंदू संस्कृतीत दुसऱ्याबद्दल सकारात्मक विचार करण्याचं तत्त्वज्ञान मांडलं गेलं आहे. त्यामुळे समुत्कर्षच्या नावातच सर्वांचा उत्कर्ष दडलेला आहे, अशी भावना ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड मध्ये सुरु झालेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त
धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ना. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, कोथरुड दक्षिण मंडल कुलदीप सावळेकर, भाजप उत्तर मंडल माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वनिता काळे, शशिकला मेंगडे, कल्पना पुरंदरे, मधुरा वैशंपायन, धनंजय रसाळ, पार्थ मटकरी यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, हिंदू संस्कृतीत दुसऱ्याबद्दल सकारात्मक विचार करण्याचं तत्त्वज्ञान मांडलं गेलं आहे. त्यामुळे समुत्कर्षच्या नावातच सर्वांचा उत्कर्ष दडलेला आहे. समाजातील प्रत्येकालाच उत्कर्ष व्हावा, या उद्देशाने समुत्कर्ष ग्राहक पेठ ही चळवळ सुरु झाली आहे. गेल्या वर्षभरात कोथरुड मधील असंख्य नागरिकांना याचा लाभ झाला आहे. जवळपास ११००० पेक्षा जास्त कलाकार, दिव्यांगजन, आर्थिक दुर्बल कुटुंब या सर्वांनाच या उपक्रमाच्या माध्यमातून स्वस्त आणि दर्जेदार धान्य सवलतीच्या दरात मिळू शकले. त्यामुळे या उपक्रमाचा उद्देश यशस्वी होत आहे.

ते पुढे म्हणाले की, आगामी काळंही सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे प्रत्येकजण मोठ्या प्रमाणात खरेदी करेल. त्यामुळे या काळात अशा पद्धतीने पुन्हा धान्य महोत्सवाचे आयोजन केल्यास, सर्वसामान्यांना याचा मोठा लाभ होईल, अशी भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, दोन दिवसांच्या या धान्य महोत्सवात समुत्कर्ष कार्डधारकांना ३० टक्के आणि सर्वसामान्य ग्राहकांना १५ टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यासोबतच महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी; यासाठी प्रदर्शन आणि विक्री व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्याचाही नागरिकांनी लाभ घेऊन महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ना. पाटील यांनी यावेळी केले.

See also  महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस