अमोल बालवडकर फाउंडेशन च्या वतीने कोथरूड येथील जीत मैदान येथे महिला मेळावा संपन्न; हजारो महिलांची उपस्थिती

कोथरुड : कोथरुड विधानसभा मतदारसंघात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या अनुषंगाने अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित अभियानांतर्गत ज्या महिला भगिनींनी नावनोंदणी केली अशा असंख्य भगिनींचा काल कोथरुड मधील परमहंस नगर, जीत मैदान येथे महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कोथरुड मतदारसंघातील सुमारे 10 हजार महिलांची लाडकी बहिण योजनेसाठी नोंदणी करून घेतली होती. यापैकी काल 4 हजार महिलांचा काल मेळावा घेण्यात आला. यावेळी अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक साडी देखील भेट म्हणून देण्यात आली. तसेच महिलांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून अमोल बालवडकर यांच्या मातोश्री उपस्थित होत्या. दरम्यान परिसरातील समस्त महिला भगिनींनी या मेळाव्यास उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवून या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. यावेळी माजी नगरसेवक, माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी  महिलांशी संवाद साधला.

See also  बालवडकर परिवाराच्या वतीने मोफत पंढरपूर यात्रेचे आयोजन