कोथरूड चे आमदार तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त, ६५००० झाड लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत बाणेर येथील, तुकाई टेकडी येथील वसुंधरा अभियान बाणेर या संस्थेच्या माध्यमातून 1000 झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
1000 देशी झाडे लावण्याच्या शुभारंभ आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. वृक्षारोपण प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी हरित चळवळीचे महत्त्व सांगून, वसुंधरा अभियान संस्थेने, 2006 पासून आतापर्यंत 45 हजार पेक्षा जास्त झाडे लावलेले कामाचे कौतुक करून, संस्थेस श्री छत्रपती वनश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
वसुंधरा अभियान संस्थेस जाणवत असलेल्या पाणी समस्येचे उकल करण्याचे आश्वासन देण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांच्या वतीने 1000 झाडे संस्थेला मोफत देण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार दीपक पायगुडे ,बाणेर -बालेवाडीच्या नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर ,सामाजिक कार्यकर्ते गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,इतर मान्यवर तसेच शेकडो वसुंधरा सदस्य उपस्थित होते.
घर ताज्या बातम्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वसुंधरा अभियान बाणेर संस्थेच्या माध्यमातून एक हजार...