औंध परिसरातील वाढते गुन्हेगारी रोखण्यासाठी व्यापारी असोसिएशन व नागरिकांच्या मंडळाची चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनला भेट

औंध : औंध परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या अनुषंगाने औंध व्यापारी असोसिएशन व विविध राजकीय पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांची भेट घेत चर्चा केली.

यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील,नाना वाळके, निलेश जुनवणे, विजय लांडे, सचिन वाडेकर, रवी ओसवाल, राजेंद्र मुरकुटे संग्राम मुरकुटे, अर्जुन कानूरकर, ओंकार साळुंखे,  केदार कदम आदी उपस्थित होते.

यावेळी औंध परिसरातील विविध सुरक्षा प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली. पोलीस व नागरिक यांच्या सहकार्यातून परिसरातील वाढते गुन्हेगारी यावर आळा आणण्यासाठी कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

तसेच बाणेर पोलीस स्टेशन मंजूर असूनही सातत्याने पाठपुरावा करून देखील नव्याने सुरू करण्यात येत नाही. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये वाढ होत आहे.

पोलीस निरीक्षक शैलेश संखे म्हणाले, औंध परिसरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात येत असून व्यापाऱ्यांनी मोठ्या शटर्सला सेंट्रल लॉक सिस्टीम बसवून घ्यावी, तसेच सीसीटीव्ही चा डीव्हीआर चोरांना सहजासहजी सापडणार नाही अशा ठिकाणी ठेवावा,  दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम रात्री ठेवू नये, तसेच संशयास्पद हालचाली वाटत असल्यास पोलिसांना तत्काळ कळवावे.

See also  महाबळेश्वर येथे विभागीय नाट्यसंमेलनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन