जयेश मुरकुटे सोशल फाऊंडेशन आयोजित रक्तदान शिबीराचे आयोजन

बाणेर :  जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून जयेश मुरकुटे सोशल फाऊंडेशनच्यावतीने काल (दि.१६ जून) रोजी १५४ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. नागरिकांच्या मोठ्या उत्साहात हे शिबीर बाणेर गावठाण येथील श्रीराम मंदिर बाणेर येथे आयोजित करण्यात आले. 

शहरात सातत्याने जाणवणारा रक्ताचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने जागतिक रक्तदाता दिनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत परिसरातील नागरिकांनी रक्तदान करण्यास गर्दी केली. शिबीरात आरोग्य तपासणी करून पात्र रक्तदात्यांना रक्तदानासाठी सोडण्यात आले. रक्तदात्यांची योग्य काळजी घेतली जात होती. त्यामुळे प्रत्येक रक्तदात्यांकडून फाऊंडेशनबद्दल विशेष आभार व्यक्त केले जात होते.

“राज्यात रक्ताची गरज नेहमीच जाणवत असते. शासन असेल किंवा अनेक सामाजिक संस्था याबाबत वारंवार आवाहन करत असतात. हीच बाब लक्षात घेवून जागतिक रक्तदाता दिनाच्या पार्श्वभूमीवर फाऊंडेशन माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन केले. रक्तदात्यांच्या मोठ्या उत्साहात हे शिबीर पार पडले. याचा आनंद आहे. तसेच रक्तदानाच्या महान कार्याला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या सर्व नागरिक, डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी यांचे विशेष आभार व यापुढेही फाऊंडेशनच्या माध्यामातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येतील. असा विश्वास यावेळी जयेश मुरकुटे सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी व्यक्त केला.”
पुना ब्लॅड बँक यांचे मोठे सहकार्य या रक्तदान शिबीराला लाभले.

या रक्तदान महाशिबीराच्या निमित्ताने माजी नगरसेविका रंजना अशोक मुरकुटे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, स्वीकृत नगरसेवक अर्जुन शिंदे, माजी सरपंच जंगल रानावरे, स्वप्निल दुधाने, शिवसेना पदाधिकारी नाना वाळके, उद्योजक योगेश विधाते, राष्ट्रवादी पदाधिकारी योगेश सुतार, कॉंग्रेस पदाधिकारी जीवन चाकणकर, प्रदेश कॉंग्रेस कमिटी सदस्य प्रो. यशराज पारखी व आदींनी आवर्जून उपस्थिती दर्शवली.

See also  कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार