बाणेर येथील काँक्रीट रस्त्याचे काम थांबवल्या प्रकरणी भाजपा नेते मधुकर मुसळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे : पुणे महापालिकेचे माजी नगरसेविकेचे पती आणि भाजप नेते मधुकर मुसळे यांच्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी बाणेर येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे सुरू असलेले काम थांबवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी पीएमसीचे अधिकारी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी खोदकाम करत असताना ही घटना घडली. बाणेर येथील पाषाण-सूस उड्डाणपुलाजवळ अधिकारी रस्ता खोदत असताना मधुकर मुसळे आले आणि त्यांनी ही जमीन आपल्या मालकीची असून त्यासाठीची कागदपत्रे आपल्याकडे असल्याचे सांगून काम थांबविण्यास सांगितले. त्यांनी त्यांना काम सुरू ठेवू दिले नाही, त्यानंतर पीएमसीच्या अधिकार्‍यांनी याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली.

याप्रकरणी मधुकर मुसळे याच्याविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

See also  कोथरूड मध्ये पेट्रोल २४ रुपयांनी स्वस्त, वर्धापन दिनानिमित्त कोथरूड युवक राष्ट्रवादी तर्फे यशस्वी मोहीम