मराठा आरक्षण चळवळीतील प्रसाद देठे यांनी फाशी घेवून आत्महत्या

पुणे : मराठा आरक्षणासाठी पुण्यातील वाघोली जवळील कटकेवाडी येथे मराठा आरक्षण चळवळीतील प्रसाद देठे यांनी फाशी घेवून आत्महत्या केली.

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असताना चिठ्ठीमध्ये पंकजा मुंढे, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, तायवाडे, टि पी मुंढे , गायकवाड अश्या ओबीसी नेत्यांचा उल्लेख करत आम्हाला आरक्षण मिळु द्या असा उल्लेख आहे.
जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटु नका ही विनंती केली आहे.

प्रसाद देठे हे मुळ बार्शीचे असुन सध्या अनेक वर्षांपासुन पुणे शहरातील वाघोली येथील परिसरात वास्तव्यास होते. मराठा आरक्षण चळवळीसह ते छत्रपती संभाजी महाराज समाधी तुळापुर चा विकास व्हावा म्हणुन देखील सक्रिय होते. त्यांच्या मागे पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

डॉ.धनंजय जाधव (सरचिटणीस, स्वराज्य)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक युवक आपल्या प्राणांची आहुती देत आहे. राज्य सरकार मात्र मराठा समाजाच्या मागणीप्रमाणे आरक्षण देण्यास टाळत आहे. प्रसाद देठे हे मराठा आरक्षण चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली !मराठा समाजाच्या मागणीप्रमाणे आरक्षण न देणारे महाराष्ट्र सरकार व मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांमुळेच या आत्महत्या होत आहेत. या नेत्यांनी आता मराठा आरक्षणाला विरोध करणे थांबवावे नसता या सर्व नेत्यांवर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करू.

See also  छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मागदर्शन शिबीर संपन्न, आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते उद्घाटन