अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर तर्फे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त लाल महाल येथे त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वराज्य जननी,शेतकऱ्यांच्या कैवारी,ज्यांच्या प्रेरणेतून जगाला हेवा वाटवा असे स्वराज्य उभे झाले,खरी लोकशाही रुजली,स्त्रियांना सन्मान मिळाला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या ४२६ व्या जयंती निमित्त अभिवादन केले.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर युवक अध्यक्ष युवराज दिसले. सरचिटणीस गणेश मापारी,भाग्यश्री बोरकर, राकेश गायकवाड,सुनिल पवार, मुकेश यादव, तानाजी शिरोळे, सुशिल पवार,स्मिता पवार, पल्लवी पवार, संगिता भालेराव,इ. पदाधिकारी उपस्थित होते

See also  पुणे लोकसभा पोटनिवडणुक लवकरच लागणार,” राष्ट्रवादीही इच्छुक अजित पवारांनी दिले संकेत