आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त हर्बायुतर्फे शनिवारी हर्बायु योग प्रभात अंतर्गत मोफत ऑनलाईन विशेष कार्यक्रम

पुणेः- स्वतःसाठी आणि समाजासाठी योग ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची यंदाची केंद्रीय संकल्पना असून यानिमित्त हर्बायुतर्फे शनिवार दिनांक २१ जून रोजी एका मोफत ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम उद्या शनिवार दिनांक २१ जून २०२४ रोजी सकाळी ६.०० ते ७.१५ या वेळेत झूम या व्यासपीठाच्या माध्यमातून होणार आहे.

यासाठी https://zoom.us/j/99965973089 लिंकव्दारे या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.
मधुमेह मुक्त भारत अभियानाशी जोडले गेलेले सर्व मधुमेही, मधुमेहाच्या पूर्व अवस्थेतील व्यक्ती आणि स्वास्थ्य प्रचारक या सगळ्यांना डायबिटीस रिव्हर्सल बरोबरच  उत्तम आरोग्य प्रदान करण्याच्या उद्देशाने राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी हर्बायु योग प्रभात या ऑनलाईन कार्यक्रम सप्टेंंबर २०२३ पासून सुरू केला आहे. या अंतर्गत सोमवार ते शनिवार रोज सकाळी ६.०० वाजता सर्वांना योग विद्येचा मोफत लाभ घेता येतो. शनिवार दिनांक २१ जून २०२४ रोजी सकाळी होणाऱ्या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन हर्बायुतर्फे करण्यात आले आहे.

See also  डॉक्टर दिलीप मुरकुटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन व आदर्श मातांचा सत्कार