कोथरूड विधानसभेसाठी कोथरूड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आग्रही!

कोथरूड : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा एक महत्त्वपूर्ण आणि महायुतीचे प्राबल्य असतानाही महाविकास आघाडीला मताधिक्य मिळवून देऊ शकनारा मतदारसंघ आहे. अशा वेळी मविआमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मात्र जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत कसबा आणि कोथरूडमध्ये निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना चांगलाच जिव्हारी लागला.

या अनुषंगाने कोथरूड विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक झाली असता या ठिकाणी आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शक्ती जास्त असून ही निवडणूक लढवलीच पाहिजे, असा एकमुखाने निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यासाठी वेळ पडल्यास जीवाचे रान करू, पण विजयश्री खेचून आणू, अशी आग्रही भूमिका घेत पदाधिकाऱ्यांनी मा. राज्यसभा खा. वंदनाताई चव्हाण, महाराष्ट्र राज्यातील पक्षाचे प्रवक्ते श्री. अंकुश काकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची भेट घेतली.

या भेटीत कोथरूड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षातर्फे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. स्वप्नील दुधाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. संदीप बालवडकर या दोन नावांची स्थानिक पातळीवर तयारी असून पक्षाचा आदेश अंतिम असणार आहे, असे स्पष्ट केले आहे. या दोंघापैकी एकास संधी उपलब्ध झाल्यास जीवाचे रान करून विजयी गुलाल उधळू, असे भावनिक आवाहन करताना पदाधिकाऱ्यांनी दोन्ही उमेदवार सुशिक्षित आणि सुसंस्कृत असून शहराच्या विकासासाठी योग्य आहेत, असे सर्वांनी सांगितले.

हा निर्णय एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नसून मविआतील अन्य घटक पक्षांशीही चर्चा होणार असली तरी आघाडीला या मतदारसंघात अनेक वर्षांनंतर विजय मिळवायचा असेल ही जागा राष्ट्रवादीला सोडणे फायदेशीर ठरणार आहे असे सर्व पदाधिकारी कार्यकार्त्यांचे ठाम मत आहे.

यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी श्री.गजानन थरकुडे, स्वप्नील दुधाने, संदीप बालवडकर, संतोष डोख, किशोर कांबळे, सुषमा सातपुते, गिरीश गुरुनानी, ज्योती सूर्यवंशी, वैभव कोठुळे, प्रमोद शिंदे, सुजाता कसबे, किशोर शेडगे, ऋतुजा देशमुख, योगेश सुतार, अमित गोडांबे आदी उपस्थित होते.

See also  जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीचे व श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दर्शन