राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या कार्याध्यक्षपदी जयेश मुरकुटे यांची निवड

बाणेर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)  कोथरूड विधानसभा कार्याध्यक्षपदी जयेश मुरकुटे यांची निवड करण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष  प्रशांत  जगताप यांनी निवडीचे पत्र दिले.


यावेळी कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाणे, शहर उपाध्यक्ष संदीप  बालवडकर, ॲड. प्रमित गोरे उपस्थित होते.

यावेळी जयेश मुरकुटे म्हणाले, पक्षाने माझ्यावर आणि माझ्या कामावर विश्वास ठेवून जी जबाबदारी दिली आहे, त्याबद्दल मी पक्षाचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब तसेच प्रशांत दादा जगताप यांचे मनापासून आभार मानतो.तसेच दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत पक्षाचे विचार तळागाळा पर्यंत पोहोचवण्याचे काम मी करून, नेतृत्वाचा विश्वास नक्की सार्थ ठरवेन.

बाणेर परिसरातील जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जयेश मुरकुटे यांनी रक्तदान, क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, ॲम्बुलन्स सेवा, आदी विविध सामाजिक उपक्रम यशस्वी रित्या राबवले आहेत.

See also  इंडिया आघाडीच्या लोकतंत्र बचाव सभेत सुनिता केजरीवाल यांचे भाषण, तर केजरीवाल यांच्या जेलमधून जनतेला 24 तास मोफत वीज व मोहल्ला क्लिनिक, शिक्षणासह सहा हमी